Monday, February 14, 2011

चिपळूणचा गेवळकोट











चिपळूण हे मुंबई-पणजी महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे. पुणे - मुंबई - सातारा - कर्‍हाड इत्यादी गावांशी गाडी मार्गाने जोडले गेले आहे. तसेच चिपळूण कोकण रेल्वेनेही जोडलेले आहे. चिपळूण जवळ वशिष्ठी नदीची खाडी आहे.सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते.

या व्यापारी मार्गावर अंकूश ठेवण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेल चा गोपाळगड तर खाडीच्या अंतर्भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला.

गोवळकोट उर्फ गोविंदगड असे नाव असलेला हा लहानशा आकाराचा किल्ला मुख्य:त गोवळकोट म्हणूनच स्थानिकांमधे परिचित आहे. चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेतून गडाकडे जाणारा मार्ग गाडीमार्ग असून खाजगी वाहने पायथ्यापर्यंत जातात. गडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिर आणि त्याचे प्रांगण उत्तम प्रकारे सुशोभित केलेले आहे. पुर्वी या भागामधे करंजाची विपूल झुडुपे होती. या झुडुपांमधे देवी प्रकटली म्हणून तीचे नाव करंजेश्वरी देवी पडले. या आठव्या शतकातील मंदिराचा सध्या जिर्णाद्धार करण्यात आला असून तेथे रहाण्याचीही उत्तम व्यवस्था आहे.

गोवळकोटावर पाणी नाही. त्यामुळे येथूनच पाणी सोबत घेता येईल. येथिल पायर्‍यांच्या मार्गाने दहा पंधरामिनिटांमधे चढून वर आल्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पाची भव्य इमारत आहे. तेथूनही एक कच्चा गाडीरस्ता मदरशा जवळून खाली उतरतो. या प्रकल्पाजवळून पाच दहा मिनिटांच्या काहीशा चढाव्यावर किल्ल्याची तटबंदी दिसते. या तटबंदीमधील दरवाजा मात्र नष्ट झालेला आहे. दोन्ही बाजूचे दोन बुरुज धरुन उभे आहेत. यातील डावी कडील बुरुजावर झेंडयाचा खांबावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. झेंडय़ाखालीच तोफही आहे. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. उजवीकडील बुरुजावरही मोठय़ा आकाराच्या दोन तोफा पडलेल्या आहेत.

गडाची तटबंदी रुंद असलीतरी ती मधून मधून ढासळलेली असल्याने कधी वरुन तर कधी खालून गड फेरी मारावी लागते. गोवळकोटाची तटबंदी ही रचीव दगडांची आहे. त्यामुळे ती अनेक ठिकाणी ढासळलेली दिसते. गडावर रेउजाई मातेचे मंदिर आहे. त्याचा नव्यानेच जिर्णेद्धार करण्यात आलेला आहे.

येथिल तटबंदीवरुन चालत पश्चिम अंगाला आल्यावर या बुरुजावरुन वशिष्ठ नदीच्या खाडीचे सुरेख दृष्य दिसते. हिरवीगार शेते आणि नारळी पोफळीच्या बागा मन प्रसन्न करतात. मुंबई-पणजी महामार्गावरील वाहतूकही येथून दिसते.

बुरुजाच्या बाजुला असलेल्या उंचवटय़ावरुन गडाचा पुर्ण देखावा दिसतो. या उंचवटय़ाच्या खाली मोठा तलाव आहे. हा तलाव बांधीव असून आत उतरण्यासाठी पायर्‍याही केलेल्या आहेत. मात्र सध्या तलावात टिपूसभर पाणी सुद्धा टिकत नाही.

मोक्याच्या ठाकाणी असलेल्या गोवळकोट छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात आणून त्याची दुरुस्ती केली होती. याचे उल्लेख सापडतात. किल्ल्याचा आकार लहान असला तरी तासाभराचा अवधी कसा निघून जातो ते कळत नाही आणि आपण परतीच्या वाटेकडे चालू लागतो. 

Thursday, July 1, 2010

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे



का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे ...

एक मी एक तू , शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू साऱ्यात तू ...
ध्यास मी श्वास तू , स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू ...


घडले कसे कधी, कळले जे न कधी
हकुवार ते , यावे कसे ओठावरी ...
दे न तू साथ दे , हातात हात दे
नजरेतन नजरेतुनी इकरार घे ...

Wednesday, June 30, 2010

राज फडकवणार युरोपात झेंडा

महाराष्ट्रात मराठीचा लढा उभारणारे राज ठाकरे आता सातासमुद्रापारच्या मराठी तितुका मिळवण्यासाठी थेट युरोप गाठणार आहेत. येत्या २३ ते २५ जुलै दरम्यान स्वित्झर्लंड येथे होणा-या युरोपीय मराठी संमेलनाचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होईल.

युरोपमध्ये राहणा-या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणा-या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. चार दिवस चालणा-या या संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होतील.

या संमेलनाला क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कुष्ठरोगींची निस्वार्थ सेवा करणारे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, संगीतकार अशोक पत्की, गझलकार भीमराव पांचाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे कलाकारही तेथे आपली कला सादर करतील.

संमेलनाच्या उद्घाटनानंतर निकिता मोघे यांनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राच्या महानायिका हा कार्यक्रम होईल. यात शर्वरी जमेनिस, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक आदी नायिका नृत्य सादर करतील.

संमेलनात सुनील गावस्कर, आमटे पती-पत्नी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सचिन खेडेकर आणि डॉ. महेश पटवर्धन या मुलाखती घेणार आहेत. डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘ वाह गुरू ’ या नाटकाचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग संमेलनातच होणार आहे. यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

अशोक पत्की यांची संगीत मैफल आणि भीमराळ पांचाळ यांच्या गझलांचा कार्यक्रम देखिल संमेलानमध्ये होणार आहे. प्रशांत दामले आणि मकरंद अनासपुरे ‘ गाठ आहे सत्याशी ’ हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या प्रमुख कार्यक्रमांसह युरोपचे मराठमोळे वाद्यवृंद एक विशेष कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच डॉ. निनाद ठाकरे ‘ लग्नानंतर काय ?’ हा काऊन्सिलिंगचा कार्यक्रम करणार आहेत.

या व्यतिरिक्त कीर्तन, सहल आदी उपक्रमही या संमेलनांतर्गत होतील. तसेच या सोहळ्यासाठी खास मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे सातासमुद्रापार गेलेल्या अनेक जणांना अस्सल मराठी चव चाखता येईल.
........................

संमेलनासंदर्भात अधिक माहितीसाठी www.ems2010.org या वेबसाइटला भेट द्या.
संमेलनाच्या प्रायोजकत्वासाठी संपर्क - राजन बांदेकर ( मोबाइल - 98200 80827 , ईमेल- rbconsultants@mtnl.net.in )

Wednesday, June 16, 2010

माझिया प्रियाला प्रीत कळेना.

तुझी नि माझी भेट ती क्षणोक्षणीत आठवे

आधी कधीना वाटले काहीतरी होते नवे


सांगू कश्या मी तुला सख्यारे माझ्या ह्या भावना.


माझिया प्रियाला प्रीत कळेना.



जागून तारे हे मोजत आहे


तुझ्यात मी हि रूजतो आहे


कधी तुला ग कळेल सारे खेळ आहे जुना..






माझिया प्रियाला प्रीत कळेना..

Saturday, April 17, 2010