Friday, November 20, 2009

आई म्हणजे आई असते...


आई म्हणजे आई असते

जगा वेगळी बाई असते.....


तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....


घरातली तुलस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....


तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तलवार
घर चालत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....


आपल्या बलाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....
आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे.......
म्हणुन ती सतत तलमलत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!!

सांग कुठे शोधू तुला ?


सवाल हा या क्षणांचा

आतुरलेल्या जवाबाला
डंख मारिती विंचवाचा
निरपराधी त्या मनाला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?

तुटला हा बांध अश्रूंचा
करुनिया कमजोर नजरेला
रस्ता हा निखार्यांचा
नाजूक पाऊली चालला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?

पट्टा चालतो या मंदांचा
मूक करिती हे शारदेला
घाव सोसत या शंधांचा
मर्द शांत हो जाहला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?

टाहो अनाथ लेकुरांचा
ऐकुनी पान्हा ना फुटला
कैसा बंदोबस्त भोन्दुंचा
देव कुठे ना दिसला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?


Monday, November 9, 2009

राजचे २८८ आमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनीराज्यातील २८८ आमदारांनामराठी अस्मितेसाठीमराठीतूनच शपथ घ्यावी असेआवाहन करणारे एक पत्रपाठवले होते . ते नमके कायहोते हे सामान्य वाचकांनावाचायचे असेल . ऑनलाइन वाचकांसाठी राज याचेआमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे . 
खालील लिंकवर क्लिक करा.

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. १ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. २ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. ३

Saturday, November 7, 2009

मराठी पर्व विशेष वॉलपेपर


1 May Marathi Wallpaper
Tukadoji Maharaj Wallpaper

Kusti Wallpaper
Aarati Prabhu Wallpaper
Aarti Prabhu wallpaper



आपल्या सचिनची फोटोबायोग्राफी...


Happy Birthday Sachin
आपल्या सचिनच्या वाढदिवसानिमित्त 
त्याच्या ‘ रेकॉर्डब्रेक ’ आयुष्याचा 
शोध घेणारी ही फोटोबायोग्राफी...