सवाल हा या क्षणांचा
आतुरलेल्या जवाबाला
डंख मारिती विंचवाचा
निरपराधी त्या मनाला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
तुटला हा बांध अश्रूंचा
करुनिया कमजोर नजरेला
रस्ता हा निखार्यांचा
नाजूक पाऊली चालला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
पट्टा चालतो या मंदांचा
मूक करिती हे शारदेला
घाव सोसत या शंधांचा
मर्द शांत हो जाहला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
टाहो अनाथ लेकुरांचा
ऐकुनी पान्हा ना फुटला
कैसा बंदोबस्त भोन्दुंचा
देव कुठे ना दिसला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
डंख मारिती विंचवाचा
निरपराधी त्या मनाला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
तुटला हा बांध अश्रूंचा
करुनिया कमजोर नजरेला
रस्ता हा निखार्यांचा
नाजूक पाऊली चालला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
पट्टा चालतो या मंदांचा
मूक करिती हे शारदेला
घाव सोसत या शंधांचा
मर्द शांत हो जाहला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
टाहो अनाथ लेकुरांचा
ऐकुनी पान्हा ना फुटला
कैसा बंदोबस्त भोन्दुंचा
देव कुठे ना दिसला
म्हणोनी, एक सवाल माझा
सांग कुठे शोधू तुला ?
No comments:
Post a Comment