Thursday, November 5, 2009

...ती असते आठवण


आठवण...काय असते ही आठवण


आयुष्यातल्या सोनेरी दिवसांना मनाच्या मखमली पेटित बंदिस्त करते...ती असते आठवण
त्या अनमोल क्षणांची जी करते साठवण...ती असते आठवण

कोमेजलेल्या मनाला पुन्हा फुलवते...ती असते आठवण
हसता हसता डोळ्यात आसू आणते...ती असते आठवण

वाहत्या जखमांवर मलमपट्टी करते... ती असते आठवण
आणि भरलेल्या जखमांच्या वेदना पुन्हा जागवते... तीही आठवणच असते

कधी चांगली बनून तर कधी वाईट पण जी सतत सोबत असते...ती असते आठवण
मनाची सगळ्यात जवळची सोबतीण असते आठवण...

एकट असताना मनात गर्दी करते... ती असते आठवण
आणि गर्दीतही मनाला एकाकी करते... ती असते आठवण

No comments: