फक्त तुझे नि माझे,,,
वेगळेच जग असावे,,,
फक्त तू मला,,,
अन् मीच तुला दिसावे,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
माझे शब्द तुझ्यासाठी,,,
तुझे शब्द माझ्यासाठी,,,
एवढ्यासाठीच स्वर ऐकू यावे,,,,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
माझे जग तुझ्यापर्यंत,,,
तुझे जग माझ्यापर्यंत,,,
येऊन जसे स्तब्ध व्हावे,,,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
मी तुझ्या नयनात,,,
तू माझ्या नयनात,,,
जसे हरवून जावे,,,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
तुझे सर्वस्व माझ्यासाठी,,,
माझे सर्वस्व तुझ्यासाठी,,,
दोघांनी एकजीव व्हावे,,,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
स्वप्नातही जगायला,,,
आवडले असते मला,,,,
स्वप्नात तरी प्रेम माझे,,,,
तुला कळायला हवे,,,
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे................
No comments:
Post a Comment