Friday, November 6, 2009

अजाणता


अजाणता आपण किती भावूक होतो,

भूक - तहान हरवते आणीं तिच्या स्मृतित हरवून जातो...

तिच्या येण्याच्या प्रत्येक वाटेकडे आपली नजर असते,
तिच्या मनात काही नसले , तरीही ती आपलीच असते....

तिच्या प्रत्येक नजरेत दडलेला एक शिकार असतो,
तिचा प्रत्येक तीर् आपल्या हृदयाला भेदुन गेलेला असतो...

जीवनाच्या प्रत्येक क्षणात तिच्या येण्याची चाहूल असते,
दिवस गेला मावळून, तरी तिच्या येण्याची एक वेडी आशा असते....

तिचा चेहरा आपल्या हृदयात घर करून घेतो,
क्षणभर का होईना, त्या चेहरयवर आपणही मन्त्रमुग्ध होतो...

अजाणता आपण किती भावूक होतो,
भूक - तहान हरवते आणीं तिच्या स्मृतित हरवून जातो...

No comments: