राज ठाकरे - व्यक्तिमत्त्व
असं म्हणतात की चाणाक्ष व चतुर नेता लोकभावना ओळखून त्यावर सहज स्वार होऊ शकतो. राज ठाकरे यांनी ते दाखवून दिलं आहेच; पण आज मनसेचे झेंडे घेऊन बेभान नाचणाऱ्या पोरांना भविष्याची दिशा दाखवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडलीय...........
स्वरराज श्रीकांत ठाकरे यांची जन्मपत्रिका ज्योतिषाने बनवली तेव्हा त्याने या मुलाच्या आईबाबांचे पत्रिकेतल्या एका प्रबळ योगाकडे लक्ष वेधले होते, असे सांगतात. तो होता राजयोग! राज ठाकरे यांच्या पत्रिकेतला हा राजयोग त्यांना प्रत्यक्षात किती व कधी फळतो, याचे कुतूहल महाराष्ट्रात आता वाढत जाईलच. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढच्या वीस-पंचवीस वर्षांची कुंडली मांडली तर त्यात राज नावाचा ताकदवान ग्रह घर करून राहणार, याची खूणगाठ सर्वच संबंधितांनी एव्हाना मनाशी बांधली असेल. लोकसभेच्या निकालांत राज यांनी चुणूक दाखवली. आता त्यांनी तेरा शिलेदार विधानसभेत पाठवून राजकारणाच्या केंदस्थानी दमदार एंट्री घेतली आहे.
राज यांच्या या एकहाती कर्तबगारीने बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात कोणते तरंग उमटत असतील, याची कल्पना करणे कठीण आहे. पण राज यांचे 'व्यक्तिमत्त्व' म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्याही पेक्षा लवकर हिट झालेला 'नवा अवतार' आहे. राज बाळासाहेबांसारखे बोलतात, हातवारे करतात, पॉज घेऊन विनोद करतात, तर्जनी रोखून आरोप करतात किंवा दमात घेतात, गॅलरीत येऊन तसाच हात हलवतात वगैरे गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी तशा वरवरच्या आहेत. राज यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाचा 'ताणाबाणा' आणि 'पोत' तसाच्या तसा उचलला आहे, हे त्यांच्या यशाचे खरे इंगित आहे. तसे पाहिले तर, त्यांना या राजकारणाचे बाळकडू काकांकडून फार लवकर मिळाले. शिवसेनेची विद्याथीर् सेना नावारुपाला आली, छोटेमोठे राडे करू लागली ती राज यांच्याच नेतृत्वाखाली. शिवसेना-भाजप युतीची सत्ता १९९५मध्ये आली तेव्हा अवघ्या २७ वर्षांचे असणारे राज प्रचारासाठी जागोजागी फिरले होते. त्यांच्या आक्रमक, 'ठाकरी' भाषणांना तेव्हाही जोरदार प्रतिसाद मिळत असे. राज यांच्याऐवजी भविष्यात उद्धव हेच बाळासाहेबांचा वारसा चालवतील, हे सांगूनही तेव्हा कुणाला खरे वाटले नसते!
एकीकडे 'पोलिटिकल अॅनिमल' असणारे राज तर दुसरीकडे आपल्या छंदांवर, शांत जीवनशैलीवर मनापासून प्रेम करणारे मृदूभाषी उद्धव. या आपल्या मोठ्या चुलत व मावस भावाने राजकारणाची धकाधक अनुभवावी, मोर्च्यांमधला थरार जवळून पाहावा, आंदोलनांचा अनुभव घ्यावा, यासाठी राज हेच मावशीला म्हणजे माँ साहेबांना 'उद्धवला माझ्यासोबत पाठव' असे सांगत, असे म्हणतात. शिवसेनेची अशी अनेक आंदोलने उद्धव यांनी त्या काळात जवळून पाहिली. कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याने टिपलीही.
युती सरकार गेल्यानंतर आणि बाळासाहेब थकत चालल्यावर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. मग शिवसेनेत किती कोंडी व्हायची, हे सांगताना राज म्हणत की, शेवटी माझी पाठ भिंतीला लागली. म्हणजे, त्यांना इतके कोपऱ्यात रेटण्यात आले. राज यांनी कुठेही दौरा ठरवला की, आधी योग्य ते निरोप जायचे; राज यांच्या कार्यक्रमांना, आंदोलनांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरीच लावायची नाही; पक्षाच्या निर्णयांची त्यांना माहितीच द्यायची नाही, असे प्रकार सुरू झाले, असे म्हणतात.
या पार्श्वभूमीवर 'विठ्ठला'चे गुणगान करतानाच 'बडव्यां'चा समाचार घेत राज यांनी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा चौरंगी झेंडा ९मार्च, २००६ रोजी फडकवला. त्याला आता साडेतीन वषेर् झाली. राज यांनी शिवाजी पार्कवर नव्या पक्षाचा शंख फुंकला तेव्हा 'पक्ष चालवायचा म्हणजे सकाळी लवकर उठावे लागते, खूप कष्ट करावे लागतात, रात्री निव्वळ गप्पाष्टके जमवून चालत नाही' अशी टिंगल शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केली होती. तेच आता 'राज यांच्यासारखे नेतृत्व असते तर शिवसेनेची ही हालत झाली नसती' असे प्रमाणपत्र राजना देत आहेत. पक्षप्रमुख आणि राजकीय नेता म्हणून राज यांची पत मान्य झाल्याची ही मोठी खूण!
'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा जन्म झाल्यापासून राज्यात तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. फेब्रुवारी २००७मध्ये काही महापालिकांच्या, सहा महिन्यांपूवीर् लोकसभेच्या आणि आत्ता विधानसभेच्या. प्रत्येक निवडणुकीत राज यांच्या यशाची कमान चढती राहिली. या यशात त्यांच्या पक्षाच्या इतर कोणत्याही नेत्याचा फार वाटा नाही. कारण राज पक्षातल्या उतरंडीच्या डोक्यावरून मतदारांशी थेट डायलॉग करतात. बाकी सारे असतात ते 'राजसाहेबां'चे निव्वळ शिलेदार. ही थेट 'रॅपो'ची पद्धतही हुबेहूब बाळासाहेबांसारखी. त्यांच्या 'कल्याणकारी हुकूमशाही'शी नाते सांगणारी.
मनसेनाप्रमुख म्हणून साडेतीन वर्षांच्या कारकिदीर्त राज ठाकरे यांच्या 'इंजिना'ने सफाईने केलेले 'शंटिंग' किती जणांच्या आज लक्षात आहे कुणास ठाऊक! पण पहिल्या तुफानी सभेत राज ठाकरे यांचे भाषण सर्वसमावेशक होते. त्यात मराठी माणसाचा मुद्दा होताही. पण भर होता तो बिजली, सडक, पाण्यावर. जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेल्या मॉडर्न शेतकऱ्याचे स्वप्न तेव्हा राज दाखवत होते. त्यांच्या पक्षाचा झेंडाही तसाच सर्व रंगांना स्थान देणारा, सर्वांना जवळ करू पाहणारा होता. शिवसेनेने सोडून दिलेला 'मराठी माणूस' राज यांनी तेव्हा पुरता मिठीत घेतला नव्हता. तो त्यांनी नंतर घेतला आणि हा नवा, एकसूत्री अजेंडा जबरदस्त क्लिक झाला. राज हे जसे करिष्मा असणारे नेते आहेत, तसा त्यांनी हातात घेतलेला अजेंडाही तितकाच 'ज्वलंत' आहे. या दोन्हीचा समसमा संयोग म्हणजे राज यांचे यश! म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पूवीर्च्या यशाची नवी टेक्नो सॅव्ही, तरुण आवृत्ती!
असं म्हणतात की, चाणाक्ष व चतुर नेता लोकभावना ओळखून त्यावर स्वार होऊ शकतो आणि आपल्या कौशल्याने त्या पेटवू, चेतवूही शकतो. पण असामान्य नेता आपल्या नैतिक ताकदीने लोकभावनांना विधायक वळण देतो. लक्षावधी लोकांना आज खडतर वाटणाऱ्या पण अंतिमत: हिताच्या रस्त्यावर चालायला भाग पाडतो. तो भावनांचे नव्हे तर भविष्याचे राजकारण करतो. राज ठाकरे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार करत आहेत. तो असा भविष्यवेधी असेल तर आज मनसेचे झेंडे घेऊन बेभान नाचणारी हजारो मिसरुडी पोरे उद्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचा झेंडा जगभर रोवतील. ती कुढी, संकुचित न होता ग्लोबल लाटांवर स्वार होतील. असे सर्जनशील 'नवनिर्माण' करण्याइतकी हिंमत, ऊर्जा आणि प्रतिभा राज ठाकरे दाखवतात का, या प्रश्ानचे उत्तर विजयाचे ढोलताशे बंद होतील, तेव्हा शोधावे लागेल!

No comments:
Post a Comment